विदर्भात पतंजलीच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग तयार होणार

काटोल येथे संत्रा प्रकल्प १९९४ साली सुरु झाला परंतु मागील शासनाच्या ढीस्याय धोरणा मुळे गेल्या २५ वर्षा पासून येतील संत्रा प्रकल्पाची वाताहत झाली परंतु नवीन सरकारने व विशेषतः या भागाचे आमदार डॉ आशिष देशमुख यांनी पुढाकार घेत हा प्रकल्प नव्याने सुरू करण्याकरीता थेट पतंजली योग समूहाला आमंत्रित केले व मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पुनरजीवित करण्याचा संकल्प केला व काटोल येथे पतंजली योग समूहाच्या माध्यमातून विदर्भातील पहला फूड प्रोसेसिंग प्रकल्प काटोल संत्रा प्रकल्प केंद्रात सुरु करण्याचा मानस त्यांनी वक्त केल्याने या भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या विदर्भात संत्रा, मोसंबी, चिकू, आवळा, अलविरा ई वन औषधी निर्माण करणारे फळ मोठया प्रमाणात उत्पादित होत असून या फूड प्रोसेसिंग प्रकल्पा मुळे सर्व शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात याचा लाभ होणार आहे या प्रकल्पासाठी राज्य सरकार ३०० हेक्टर जमिन हस्तांतरित करणार असून या पूर्वीच्या २०० हेक्टर मधील युनिटला पुनरजीवित करण्यात येणार आहे आणि ना हरकत प्रमाणपत्र देऊन हा प्रकल्प पतंजली योग समूहाला हातांतरित करण्याचा निर्णय लवकरच होईल अशे मत आमदार डॉ आशिष देशमुख यांनी वैक्त केले या वेळी आचार्य बालकृष्ण यांनी आज दिनांक २१/१/१६ ला काटोल येथे संत्रा प्रक्रिया केंद्राला भेट देऊन टावर वर चडून संपूर्ण परिसराची पाहणी केली व आनंद वैक्त केला आणि राज्य सरकारने ना हरकत प्रमाणपत्र लवकर दिल्यास आम्हाला कुढली हि अडचण नाही हजारो हेक्टर जमिन खरीदी करण्याचा आमचा प्रयत्न आहे व या भागातील बेरोजगारी वर मात करण्याकरीता या भागात फूड प्रोसेसिंग प्रकल्प लवकरच तयार करू असे आश्वासन शेतकऱ्यांना बालकृष्ण यांनी दिले या वेळी देवेंद्र पारेख व मनोज जवंजाळ आणि माझी आमदार सुनील शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने संत्रा, मोसंबी, ई. फळे मोठया प्रमाणात उपलब्ध करून देऊ तसेच इंडो इस्रेल पदत्तीने संत्रा तयार करून आपल्या फूड प्रोसेसिंग प्रकल्पाला देऊ असे आश्वासन दिले या वेळी दिनकरराव राउत, रमेश फिस्के, संदिप सरोदे, समिर उमप, अविनाश कातडे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार गोस्वामी, एम.आय.डी.सी. चे अधिकारी श्री चौधरी साहेब यांच्या सह मोठया संख्येने शेतकरी अधिकारी कर्मचारी व पत्रकार हजर होते.