संत्रा झाडावरील उत्पादन वाढविण्यासाठी इस्त्राईलचे तंत्रज्ञान भारतात येणार

भारतातील विशेषत: राज्यातील नागपूर या कॉलीफोर्निया संत्रा उत्पादन होणा-या क्षेत्रात एकरी ७ ते ८ टन उत्पादन क्षमता असलेल्या संत्रा बागांची उत्पादन क्षमता २० ते २५ टन कशी करता येईल व यासाठी इस्त्राईल तंत्रज्ञान पूरक आहे. त्यामुळे इस्त्राईल शास्त्रज्ञांना या भागातील संत्रा बागा दाखवून त्यावर तंत्रज्ञान कसे करता येईल यासाठी आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी पुढाकार घेवून तालुक्यातील हातला येथील १०० एकरात १० हजार संत्रा झाडे असलेल्या धीरज जुनघरे यांच्या शेतात आज दि. १४/०१/२०१६ रोजी इस्त्राईलचे प्रादेशिक कृषी विकासतज्ञ गाबी नाखुम तसेच नागपूरचे शेती उद्योजक गोविंद डागा, देवेंद्र पारेख, आमदार डॉ. आशिष देशमुख, कृषीमित्र दिनेश ठाकरे, निरंजन जवंजाळ, रमेश फिस्के, बाळासाहेब धोटे, शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांच्यासह इस्त्राईल कृषीतज्ञांच्या संत्रा उत्पादक चमूंनी संत्रा बागांची पाहणी केली असता त्यामध्ये यांना आपल्या भागात उत्पादन क्षमता एकरी ८ टे ९ टन कशामुळे आहे हे सांगितले व त्यांनी सांगितले कि, अपुरा सूर्यप्रकाश व पाणी व्यवस्थित मिळत नाही त्यासाठी वर्षातून २ वेळा मार्च व जून मध्ये झाडाच्या फांदया छाटून सूर्यप्रकाश झाडाच्या बुडाशी गेल्यास संत्रा फळे मोठ्या प्रमाणात वाढतात. व गळ थांबते. त्यामुळे शेतक-यांनी इस्त्राईल तंत्रज्ञानानुसार संत्रा बागांचे नियोजन केले पाहिजे असे सांगितले.

तसेच काटोल येथे ज्यूस फॅकटरी तयार करून तेथील ज्यूस नांदेड येथील कंपन्या घेण्यास तयार असल्याने २ ते ३ कोटी खर्चून ज्यूस प्रकल्प तयार करा मी पुढाकार घेतो असे शेतकरी धीरज जुनघरे यांनी सांगितले तसेच आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी रामदेवबाबा निर्मित पतंजली संस्थेला काटोलचा संत्रा कारखाना चालविण्यास देण्याची तयारी दर्शवून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून येथे पतंजली समूह या भागातील संत्रा घेवून त्याचे प्रॉडकशन करून येथील संत्रा बागांना चांगला भाव मिळवून देणार आहे यासाठी माझे सतत प्रयत्न सुरु असून लवकरच हे काम होईल असा विश्वास आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच याच शेतातील ५ लाख लिटर क्षमता असलेल्या तलावाची पाहणी सुद्धा कृषी तज्ञांनी केली नजीकच्या २ कि.मी. अंतरावरील जाम प्रकल्पातून पाईप लाईन द्वारे पाणी आणून ५ लाख लिटर क्षमतेचा तलाव शेतात तयार करून बाराही महिने संत्रा बागांना पाणी मिळेल अशी व्यवस्था करणारे शेतकरी धीरज जुनघरे यांचा सत्कार याप्रसंगी कृषी तज्ञांनी केला यावेळी देनेश ठाकरे यांनी या भागातील भौगोलिक परिस्थितीची माहिती दिली .व दर महिन्याच्या रविवारी शेतक-यांना संत्रा बागांचे कॉन्सलिंग करण्यात येईल असे सांगितले. तसेच त्यांनी HAD’s चेमिथ फार्मस चारगाव ला भेट दिली यावेळी सभापती संदीप सरोदे, दिलीप ठाकरे, मारोतराव बोरकर, दिलीप कालमेघ,दिलीप हिवरकर, कुलदीप हिवरकर, प्रकाश देशभ्रतार, उत्तमराव फिस्के, सुरेश आरघोडे, धर्मेंद्र पालीवाल, अर्जुनजी ढेंगरे, आनंद मंगल बालू ठाकूर, रमेश फिस्के व परिसरातील शेतकरी पत्रकार, चंदू कडू, प्रशांत पाचपोर, रमेश चव्हाण, विजय कडू, सुरेश भुजाडे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.