नागपुरात आफ्रिकन, इंडियन सफारी : मुख्यमंत्री

jungle-safari

मुंबई : नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील आफ्रिकन आणि इंडियन सफारी नोव्हेंबर २0१७ पर्यंत सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गोरवाडा प्राणी संग्रहालयाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वनमंत्नी सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, वन सचिव विकास खारगे, मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख नागपूर सर्जन भगत, मुख्य वन्य जीव संरक्षक भगवान आदी उपस्थित होते.
गोरेवाडा प्राणी संग्रहालयासाठी ४५१ कोटी रु पयांचा आराखडा निश्‍चित केला असून या प्रकल्पाचे काम चार वर्षांत पूर्ण करावयाचे आहे. त्या दृष्टीने आराखड्यात नमूद कामांना आवश्यक त्या केंद्र शासनाच्या मान्यता मिळवून वेग देण्यात यावा,असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या प्राणी संग्रहालयाचे एकूण क्षेत्न हे ५६४ हेक्टर असून आतापर्यंत येथे रेस्क्यू सेटर, संरक्षक भिंती, नेचर ट्रेल, गोरेवाडा रिझर्व्ह – जंगल सफारी, वॉच टॉवर्स, नैसिर्गक अधिवासाशी संबंधित कामांसह वॉटर होल्सची कामे पूर्ण झाली आहेत. इंडियन सफारी अंतर्गत टायगर सफारी, बिबट सफारी, चितळ, नीलगाय यासारख्या प्राण्यांची संमिश्र सफारी यांचा समावेश आहे. एकूण १४५ हेक्टर क्षेत्नावरील या सफारीमधून नैसिर्गक अधिवासांमधील वन्यजीव पाहण्याचा आनंद पर्यटकांना घेता येईल.

या उद्यानातील चार कि.मी.च्या रोप वे च्या कामास ही आज तत्वत: मान्यता देण्यात आली. याचा विकास आराखडा तयार करून त्यास केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. प्राणी संग्रहालयातील १६ कि.मी रस्त्यांचा दर्जा सुधारण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. सर्व ऋतूंमध्ये पर्यटकांना येथील चितळ, मोर, बिबटे, सांबर यासारखे वन्यजीव पाहाता यावे हा त्यामागचा हेतू आहे. प्राणी संग्रहालयातील व्हेटर्नरी सर्जन पदे भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

कोलामार्क संवर्धन राखीव क्षेत्रात रानम्हशी संवर्धनास प्रोत्साहन
गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्क संवर्धन राखीव क्षेत्रात रानम्हशीच्या संवर्धनास विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
कोलामार्का येथे गडचिरोली जिल्ह्यातील १८0 चौ.कि.मी चे क्षेत्र २0१३ मध्ये संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोलामार्का येथे महाराष्ट्र आणि छत्तीसगड येथील रान म्हशींची संख्या २00 च्या आसपास असल्याची माहिती आज बैठकीत देण्यात आली. त्यामुळे दुर्मिळ होत असलेल्या रान म्हशींच्या संवर्धनाला कोलामार्का येथील प्रयोगात मिळालेले यश पाहता त्यास अधिक प्रोत्साहन दिले जावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. शिवाय अमरावती जिल्ह्यातील वडाळी तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर बिबट सफारीच्या निर्मितीस ही मान्यता देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी) राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अन्य अधिकारी. बिबट सफारीसंदर्भात अभ्यासपूर्ण अहवाल द्यावा- मुनगंटीवार जागतिकस्तरावर बिबट सफारीसंदर्भात कशाप्रकारे काम झाले आहे याचा शास्त्रोक्त अभ्यास करून त्यासंबंधीचा अहवाल राज्य वन्य जीव मंडळाच्या पुढील बैठकीत सादर करावा अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील हुमन नदी वरील प्रस्तावित प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात यावी, त्यामध्ये जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांचा सदस्य म्हणून समावेश करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.