“डिजिटल क्लासच्या उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे ज्ञान वाढेल

काटोल तंत्रज्ञानाच्या युगात शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थी सारख्या प्रमाणात स्पर्धेत टिकण्यासाठी त्याला प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षणा व्यतिरिक्त तंत्रज्ञानाचे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे यासाठी प्रत्येक गावात डिजिटल क्लासची निर्मिती होणे गरजेचे आहे. डिजिटल क्लासची सुरुवात आज नरखेड तालुक्यातील परसोडी दिक्षित गावातून सुरु झाली असून यासाठी सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेवून यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी केले.

परसोडी दिक्षित येथील शाळेत या डिजिटल क्लासकरिता नरेश प्रसाद दिक्षित सेवानिवृत्त टेक्निकल ऑफिसर, हनुमंतराव चौधरी सेवानिवृत्त उपमहाप्रबंधक, नितेश शुक्ला शिक्षणप्रेमी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर भूजाडकर यांनी यासाठी मदत करून नवीन आदर्श शिक्षणासाठी निर्माण केल्याबद्दल आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला. व सांगितले की, डिजिटल क्लास रुममुळे विध्यार्थ्यांना शिक्षकांच्या ज्ञानाबरोबरच अतिरिक्त ज्ञान देवून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडविता येईल आणि जो जिल्हा परिषद शाळेचा दर्जा घसरत आहे तो वाढेल. व संगणकीय युगाचे ज्ञान विध्यार्थ्यांना मिळेल तसेच आमदार साहेबांनी शाळेचे, गावकऱ्यांचे, शिक्षकांचे अभिनंदन केले व अंगणवाडी करिता खोली मंजूर करून दिली. व भारसिंगी ते परसोडी दिक्षित रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे सांगितले व BSNL चे वायफाय नेटवर्क जोडणे आणि प्रत्येक गावात वायफाय नेटवर्कची सेवा उपलब्ध करून देण्याचे सांगितले.

यावेळी शिक्षण सभापती उकेश चव्हाण, सभापती नरखेड राजू हरणे, विस्तार अधिकारी अशोकराव जांभुळकर, दिनकरराव राउत, सरपंच रमाबाई कोकाटे, उपसरपंच अमोल तिवारी, सुरेशराव शुक्ला, पुंडलिकराव चौधरी, पालक वर्ग व गावकरी उपस्थित होते.