वादळी पाऊस व गारपीट ग्रस्त पिकांची डॉ.आशिष देशमुख यांनी केली पाहणी

काटोल व नरखेड तालुक्यातील वादळी वारा व गारपीटमुळे नुकसान झालेल्या गहु, चना, वटाना, सह आंबिया बहाराचे संत्रा फुल, मोसंबी फुल व पनेरीच्या कलमांचे दि. २८ आणि २९ फेब्रुवारी ला झालेल्या वादळी वारा व गारांनी प्रचंड नुकसान झाले यामध्ये डोरली, चारगाव, सोनखांब, कोहळा, हातला, ढवळापुर, पारडी (गोतमारे) रिधोरा, सावळी, मासोद आदी सह नरखेड तालुक्यातील मोहगाव भदाडे, पिपळा केवलराम, आग्रा, शेमडा, पिपळा (खु) इ. गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून हाती आलेले गहू व हरभऱ्याच्या पीक वादळी वाऱ्याने हिसकावून नेल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यावेळी आमदार डॉ. आशिष देशमुख, यांनी शेतकऱ्याशी वार्तालाभ करून शासनाकडून भरीव मदत देण्याचे आश्वस्त केले.यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे, तहसीलदार सचिन गोस्वामी, कृषी अधिकारी बबन जुनघरे, सभापती संदीप सरोदे, दिनकर राउत, रमेश फिस्के, पं. स.सदस्य ताई खंडाते, जि.प.सदस्य पुष्पा देशभ्रतार, रिधोरा सरपंच वैभव राउत, भुषण मुसळे, संघपाल बागडे, मुरलीधर रोकडे, व पत्रकार प्रशांत पाचपोहर, चंदू कडू, तसेच नरखेड दौऱ्यामध्ये उपसभापती मायाताई दुरुगकर, दिलीप दवणे, झाडे, व सर्व अधिकारी आदींनी आज या भागाचा दौरा करून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री यांना भेटून देणार आहे या भागातील शेतकरयांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा याकरिता मुख्यमंत्र्याकडे आग्रह धरणार असल्याने वार्तालापाप्रसंगी शेतकऱ्यांना आमदारांनी दिलासा दिला आपल्या पाठीशी सरकार आहे असे सांगितले तसेच रब्बी पिके घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ दया उदा.तलावाच्या पाण्यावर कोरडवाहू शेतीत सुध्दा अनेक शेतकरी गहू, चना यांचे उत्पादन घेतात तर कुणी नदी नाल्यावरून डिझेल इंजीन लावून रब्बी पिके घेतात अशा सर्वाचा सर्व्हे संबधीत अधिकाऱ्यांनी करून घेवून त्याला न्याय मिळवून देण्याचे आदेश आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी दिले.

तसेच काटोल नरखेड तालुक्यातले रस्त्यांचे काम लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.