“मूल्यवर्धक उपक्रमातून” संस्कारशील विद्यार्थी तयार होईल

स्वातंत्र्यानंतर विद्यार्थ्यामधील नितीमुल्ये हरवत चालले आहे. त्यांच्या बालमनावर उचित संस्कार व्हावे. आणि भारताचा भावी नागरिक कर्तव्यनिष्ठ तयार व्हावा. या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्थ्या फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक जिल्ह्यात एक शाळा प्रायोगिक तत्वावर निवडून त्यात ‘मूल्यवर्धन उपक्रम’ सुरु केलेला आहे.या उपक्रमातून संस्कारशील विद्यार्थी तयार होईल. असे प्रतिपादन काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.

‘मूल्यवर्धन उपक्रमासाठी नागपूर जिल्ह्यातून जि.प.प्राथमिक शाळा,पारडसिंगा निवडली आहे.या शाळेत १ फेब्रुवारी २०१६ पासून सदर उपक्रमाची कार्यवाही सुरु आहे.या कार्यवाहीची माहिती जाणून घेण्यासाठी डॉ.आशिष देशमुख हे पारडसिंगा शाळेत आले होते. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष दिलीप तिजारे, सरपंच रेखा उईके, उपसरपंच जगन्नाथ वाघ, गटशिक्षणाधिकारी उत्तम काकडे, शिक्षण विस्तार अधिकारी जयराजसिंग गहलोद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होमेश्वर डांगोरे, उपाध्यक्ष उज्वला नागदेवे, रविकांत तिजारे, प्रशांत रिधोरकर, अंजू कथले, गौतम उमप, विनोद भक्ते, मनोहर कौरती, प्रवीण डांगोरे इ. प्रामुख्याने उपस्थित होते.

पारडसिंगा शाळेत ‘मूल्यवर्धन उपक्रम’ राबविण्यासाठी मुल्यदूत व केंद्रप्रमुख राजु धवड यांचे मार्गदर्शन लाभत आहे तसेच शाळेत उपक्रमाचे यशस्वी आयोजन करीत असल्याबाबत मुल्यदूत दिलीप केने यांचा डॉ.आशिष देशमुख यांनी सत्कार केला.उपक्रमासाठी जिल्हा समन्वयक गोपाळ घाडगे हे वेळोवेळी शाळेला भेट देवून, मार्गदर्शन करतात.

‘मूल्यवर्धन उपक्रम’ पुढील शैक्षणिक सत्रापासून काटोल –नरखेड तालुक्यातील १००% जि. प. शाळेत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात माझ्या क्षमता, माझ्या जबाबदाऱ्या, माझे नातेसंबंध या तीन विभागात अभ्यासक्रमाला पूरक कृतियुक्त कार्यक्रम व खेळ तयार करण्यात आले आहे. व शाळेत शाळेच्या वेळातच सदर उपक्रम राबवायचा आहे. पारडसिंगा शाळेतील विद्यार्थ्याचे उपक्रमांचे कौशल्य बघून आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक नागोराव ठाकरे, विलास कालमेघ, रविंद्र टेंभे, घनश्याम भडांगे, सुनंदा इंगळे, शोभा वारजूरकर, सुनिता केने, ओंकार बोबडे तसेच विद्यार्थी परिश्रम घेत आहे.