पाकिस्तानच्या सिमा रेषेच्या आत शिरून दहशतवादयांचा खात्मा केल्या बद्ल मोदी                     सरकारचे  जिल्हा भाजपच्यावतीने अभिनंदन.  

           जम्मू. काश्मीरमधील उरीच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर 11 दिवस संयम बाळगलेल्या भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले . लष्कराच्या विशेष जवानांनी बुधवारी मध्यरात्रीपासुन गुरूवारी पहाटे पर्यत केलेल्या पाच तासांच्या लक्षयवेधी कारवाईत नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत किमान 35 ते 40 दहशतवादी आणि पाकिस्तानचे नऊ सैनिक भारतीय जवानांनी मारलेत या आधीच्या सरकाने सैनिकांना असे विशेष अधिकार बहाले केले नसल्याने आपले भारतीय सैनिक मोठया प्रमाणात पाकिस्तान कडून मारल्या जात होते. परंतु मोदी सरकाने सैनिकाना गोळीबार करण्याच्या परवानगीने हे होवू शकले या बदद्ल जिल्हा भाजपच्यावतीने डॉ.राजीव पोतदार यांनी मोदी सरकारचे आभार व्यक्त केले आहे.
        गेल्या अनेक वर्षा पासुन पाकिस्तान आपल्या भारतीय एल ओ सी मध्ये प्रवेश करूण भारतीय जवानाना मारत होती. या आधी असलेल्या सरकाने सैनिकांना कोणत्याही प्रकारचा गोळीबार  करण्याची परवानगी दिलेली नसल्याने आपले सैनिक पाकिस्तानी दहशतवादी व सैनिकांकडुन मारल्या जात होते. परंतू मोदी सरकारने भारतीय सैनिकांना गोळीबार करण्याची परवानगी दिली पाहिजे अशी सर्व सामान्य जनतेला वाटत होते. त्यातच  11 दिवसा आधी येथे जम्मू काश्मीर येथील उरी येथे पाकिस्थानी सैन्यानी भारतीय जवानाना मारल्या नंतर सन सामान्याच्या मनामध्ये पाकिस्तानचा बदला घेण्याची ईच्छा खद खदत होती. व शेवटी मोदी सरकारने सैनिकांना  सरकाराला न विचारता काही धोका वाटला असता गोळीबार करण्याची परवानगी दिली व आज आपल्या सैनिकांनी पाकिस्थानच्या सिमे पलीकडे जावून त्याच्या दहशतवादयांचा व सैनिकांचा खात्मा केला. या मुळे संयुक्त राष्ट्र संघामध्ये ही भारताचे महत्व वाढले असुन भारत आता जगामध्ये एक महा शक्ती म्हणुन उदयास येत आहे. व आज भारताकडे जगातील कोणताही देश वाकडया नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही हे मोदी सरकारने सैनिकांना दिलेल्या सुटी मुळे शक्य झाले आहे.
      मोदी सरकाने योग्य व जनतेच्या मनातील ईच्छाना यश्स्वी वाव दिल्याने नागपुर जिल्हा भाजपच्यावतीने डॉ.राजीव पोतदार, माहमंत्री अरविंद गजभिये, प्रेम झाडे, किशोर रेवतकर, संजय टेकाडे, श्रीकांतजी देशपांडे, श्रीकांत पांडे,अविनाश खळतकर, विकास तोतडे यांनी  मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.