‘गाव तेथे विद्युत व्यवस्थापक ’ या अभिनव निर्णया बद्ल    पालकमंत्र्यांचे अभिनंदन.      डॉ.राजीव पोतदार

             महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी ऊर्जा विभागाचे सुत्रे हातात घेतल्यावर ऊर्जा विभागामध्ये असलेल्या समस्यांची, अडचणींची त्यांना पुर्णताःहा जाणीव होती व त्या समस्या,अडचणी सोडविण्याकरिता मा. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये शासनाकडे पाठपुरावा करून ऊर्जाविभागाला बÚयाच मोठया प्रमाणावर गतीमान केले. त्यामध्ये प्रामुख्याने राज्य लोडशेडींग मुक्त करणे. शेतकÚयांना बारा तास विज पुरवठा करणे, मागेल त्याला कृषी पंपाचे कनेक्शन देने, नवीन कनेक्शन करिता असलेली प्रतिक्षा यादी जी गेल्या अनेक वर्षा पासुन प्रलंबीत होती ती पुर्ण करणे.  तसेच महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागात नवीन सबस्टेशनची निर्मिती करणे, पॉवर फॉर ऑल, असे धोरणात्मक बदल घडवून विजनिर्मिती करिता लागणारा आर्थीक बोजा हा सुध्दा कमी करूण कमीत कमी दरामध्ये घरघुती व औद्योगीक क्षेत्राला विजपुरवठा कसा होईल या कडे विशेष भर ना.बावनकुळे देत आहेत. महापारेषन महानिर्मिती, महावितरण या मध्ये सुध्दा अतुलनीय बदल ऊर्जामंत्री बावनकुळे यांचे नेत्वृत्वात महाराष्ट्रात घडून येत आहे.
              दैनंदिन जिवनात ज्या प्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा, पाणी या मुलभुत गर्जा सोबतच विज सुध्द्ा हि गर्जेची झालेली आहे. अशा परिस्थीतीमध्ये ग्रामिण भागात कोठे मनुष्यबळ कमी असल्यामुळे तर कोठे साधनसामुग्रीचा अभाव असल्यामुळे विज पुरवठयामध्ये बÚयाच अडचणी व समस्या ग्रामिण भागातील     सर्वसामान्य जनतेला भेडसावत होत्या. या पार्श्वभुमीवर ऊर्जामंत्री बावनकुळे व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी अभिनव असा निर्णय ‘‘एक गाव एक विद्युत व्यवस्थापक’’ हा निर्णय घेतला जो खरोखरच कौतुकास्पद आहे. गावपातळीवर मिटर रिडींग घेणे, विज देयकाचे वाटप करणे, ब्रेक डाऊन अटेंड करणे, रस्त्यावरील पथदिव्याची देखभाल दुरूस्ती करणे, नवीन विज जोडणीचे काम करणे, थकबाकी असल्यास विज पुवठा खंडीत करणे. व विजेच्या संदर्भात गाव पातळीवर येणाÚया समस्या, तक्रारीची सोडवनुक करणे. हे त्या ठिकाणी नेमुन दिलेल्या व्यवस्थापकामार्फत होईल. त्या गावातील तो विद्युत व्यवस्थापक हा कंत्राटी तत्वावर घेतल्या जाणार असुन गावातीलच प्रशिक्षीत बेरोजगाराला या मध्ये प्राधान्य देण्यात येईल व ग्राम पंचायतीमध्ये त्यांच्या करिता स्वतंत्र आसन व्यवस्था असेल. यातुन राज्यातील 3000 लोकसंख्या पर्यतच्या 23617 ग्राम पंचायतीमध्ये सुशिक्षीत बेरोजगारांना काम मिळेल व त्या ग्राम पंचायतींना त्यांचा स्वतंत्र एक लाईनमन मिळेल. या उपक्रमाकरिता 100 कोटीचा खर्च राज्य शासन उचलनार आहे. ग्राम विद्युत व्यवस्थापकाला त्याच्या गुणवतेच्या, शैक्षणीक अहर्तेनुसार नेमण्यात येईल जेने करूण योग्य व्यक्तीच्या मार्फत सेवा पुरविण्यात येतील.
 या महत्वकांशी निर्णयामुळे गावागावातील नागरिंकाच्या समस्यांची सोडवून होईल व विज पुरवठा व वितरण व्यवस्था ही गतीमान व उत्कृष्ट दर्जाची होईल व सोबतच बेरोजगार युवकांना काम मिळेल. अशा या निर्णयाचे नागपुर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष डॉ. पोतदार, आमदार सर्वश्री मल्लीकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, डॉ.आशिष देशमुख, समीर मेघे, निशाताई सावरकर, उकेश चव्हान,माजी आमदार अशोकराव मानकर, विजयराव घोडमारे, जिल्हा महामंत्री अरविंद गजभिये, प्रेम झाडे, किशोर रेवतकर, संजय टेकाडे,आनंदराव राऊत, रमेश मानकर, अशोक धोटे, दिलीप जाधव, अविनाश खळतकर, विकास तोतडे,प्रतिभा मांडवकर, अजय बोढारे, मनोज चवरे व समस्त जिल्हा भाजपाच्यावतीने या निर्णयाचे अभिनंदन केले आहे.