क्रिडा क्षेत्राच्या विकासासाठी काटोल नगर परिषदला ४ कोटी मंजूर

केंद्र शासनाच्या वतीने काटोल नगरीतील क्रीडांगण व खेळाडूंना लागणारे क्रिडा साहित्य मिळवून देण्याकरिता लागणारा निधी केंद्र शासनाकडून मंजूर करण्यासाठी काटोलचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी प्रयत्न केले व प्रत्येक प्रभागातील विविध क्षेत्रात क्रिडा मध्ये आवड असलेल्या खेळाडूंना चांगले क्रीडांगण साहित्य खरेदी करण्यासाठी नगर परिषदला ४ कोटीचा निधी मंजूर करून दिला.

काटोल नगरी क्रिडा प्रेमी आहे. येथे १० ते १५ वेळा खो- खो, कबड्डी, हॉलीबॉल सारख्या राज्य स्पर्धा यापूर्वी आयोजित केल्या आहे. येथील अनेक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळात सहभागी झाले यापुढे येथे कुस्ती कबड्डी, कराटे, बास्केटबॉल, हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट सारखे खेळात या भागातील खेळाडू मोठे झाले पाहिजे यासाठी त्यांना गावपातळीवर क्रीडांगण व साहित्याची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधीकडून त्यांना प्रोत्साहन मिळाले तर ते आणखी जिद्दीने तरबेज होतात तसेच सर्व क्रीडाप्रेमीना ट्रक्स सूट सहीत ४ कोटीच्या निधीतून प्रत्येक खेळासाठी क्रीडांगण व साहित्य मिळवून दिले सोबतच भविष्यात पुन्हा निधी आणून राहिलेले क्रीडांगण पूर्ण करू असे आश्वासन दिले. मा. आमदार आशिष देशमुख यांनी सांगितले की, खेळाडूंची शारीरिक क्षमता वाढविण्याची आजच्या युगात गरज आहे. अशा खेळांच्या माध्यमांतून व्यसनमुक्त होण्यासोबतच शारीरिक दृष्ट्या सुदृढ होवू शकते त्यामुळे खेळाला महत्व दिले पाहिजे काटोल येथे पहिल्यांदा क्रिडाक्षेत्राचा विकासासाठी इतका मोठा निधी उपलब्ध पहिल्यांदा झाला असल्याचे यांनी आवर्जुन सांगितले.

क्रिडा विषयक तज्ञांना सोबत घेत कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह काटोल येथे बैठक बोलावून जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्या समक्ष खेळाडूंच्या समस्यांचे निराकरण आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी करून दिले. व अत्यंत आवश्यक असलेल्या सोयी लवकर सुरु करा असे सांगितले यावेळी नगराध्यक्ष लक्ष्मी जोशी, चरणसिंग ठाकूर, प्रा. विजय धोटे, नगरसेवक किशोर गाढवे, दिगांबर डोंगरे, रेखा उईके सभापती संदीप सरोदे, न.प. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवले, आरिफ इकबाल यांसह सर्व क्रिडा खेळाडू व नागरिक हजर होते.