काळा पैसा,भ्रष्टाचाराविरूध्द् लढाई तीव्र केल्या बदल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन डॉ.पोतदार

काळा पैसा, नकली नोटा व भ्रष्टाचार या भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळया करणाÚया तीन प्रमुख गोष्टी आहेत. व गोष्टींचे समुळ उचाटन होने गरजेचे आहे. यासाठी भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रभाई मोदी यांनी या तीन गोष्टीचे उचाटन करण्याचा उपाय म्हणून 500 व 1000 रूपयांच्या नोटा चलनातुन काढुन घेण्याचा क्रांतीकारी व धाडसी निर्णय घेतला त्या बद्ल त्यांचे नागपुर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांनी अभिनंदन केले आहे.
काळा पैसा, भ्रष्टाचार,नकली नोटा व दहशतवाद या गोष्टी देशाच्या प्रगतीस व अर्थ व्यवस्थेस वाळवीसारख्या पोखरत आहे. यामुळे देशातील वातावरण खराब झाले आहे. त्यातच याचा फायदा सीमे पलीकडील आपला शत्रु राष्ट्र घेत आहेत व बनावट चलनी नोटा भारतात पेरत आहेत. यावर चाप बसवीन्यासाठी घेतलेला हा महत्वपुर्ण निर्णय असुन प्रामाणीकपणे पैसे कमावीणाÚयांना निर्णया पासुन कोणताही त्रास होणार नाही व त्यांनी तसे घाबरण्याचे कारणसुध्दा नाही. त्यातच याचा फायदा मालमतेचे योग्य दर निश्चीत करण्यासाठी होईल,केंद्र व राज्य शासनाला कर स्वरूपात भरपूर पैसा उपलब्ध होईल, परिणामी देशाच्या विकासाला चालना मिळेल. परंतु ज्यांनी खोटया मार्गाने,शासनाची दिशाभुल करून ,अवैध्द मार्गाने ,जसे हवाला, सटट्ा तसेच डब्बा व्यापारात असणाÚया बहुतांश जणांकडे या पैशांची कुठलीही नोंद नसल्याने आता मात्र त्यांची खेंर नाही.
योग्य मार्गाने पैसा कमाविलेल्या नागरिंकांच्या हक्काच्या पैशांवर कोणतीही गदा सुध्दा येवू दिली नाही.नागरिंकांनी आपल्या 500 व 1000 रूपयाच्या नोटा बॅक,पोष्ट ऑफीस, ईत्यादी ठिकाणी त्यांचा भरणा करू शकण्यासाठीची व्यवस्था सुध्दा करूण देण्यात आली आहे. पुढील काही दिवस 100 रूपयाच्या नोंटाची बाजारात कमतरता जाणवेल मात्र या काळात व्यापारी प्रतिष्ठाने,मॉल,पेट्रोल पंप तसेच ए.टी.एम च्या ऑनलाईनच्या माध्यमाने खरेदी करता येईल ईत्यादीची व्यवस्था करूण देण्यात आली आहे.
या महत्वाकांशी निर्णयाबद्दल नागपुर जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार, महामंत्री अरविंद गजभिये,प्रेम झाडे, किशोर रेवतकर, संजय टेकाडे, संपर्क प्रमुख विकास तोतडे, अविनाश खडतकर यांनी अभिनंदन केले आहे.